Skip to main content

Posts

Featured

बापरे! उपाशी रहायचं ? अजिबात काही खायचं नाही ? रात्री झोप कशी लागेल ? थकवा नाही का येणार ? ऍसिडिटीचं काय ? डोकं दुखलं तर ? एक वेळ न जेवता तर आम्ही किती उपवास करतो तरी कुठे होतंय वजन कमी ? पण जास्त काळ पोट रिकामं ठेवायचं नसतं ना ? आजारी नाही ना पडणार ? नक्की काय खाल्लेलं चालतं ? मग नाश्ता आणि दुपारचं जेवण पण कमी करायचं का ? भात बंद करायचा का ? तेल , तूप कमी करायचं का ? नॉनव्हेज चालेल का ? चहा कॉफी काही प्यायलं तर चालतं का ? गोड खाणं बंद करायचं का ? साखर खायची नाही ना ? जास्तीत जास्त सॅलड खाल्लं तर पटकन फरक पडेल का ? मी नोकरी करतो/करते , मग कसं जमणार वेळेचं गणित ? व्यायाम कोणता करायचा ? व्यायाम करायला वेळच मिळत नाही , तर मग कसं करायचं ? व्यायाम नाही केला तरी वजन उतरेल का ? रोज वजन करायचं का ? किती दिवसात फरक जाणवेल ? काहीच फरक नाही पडला तर ? फरक पडायला सुरुवात झालीये हे कसं ओळखायचं ? वेट लॉस सक्सेसबद्दलच्या अभिनंदनाचा पाऊस कमी झाला आणि प्रश्नांचा पूर आलाय. असंख्य प्रश्न. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न. यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ते कदाचित वेगवेगळं

Latest Posts